Skip to content
Home » युगे अठ्ठावीस | Yuge Atthavis Aarti

युगे अठ्ठावीस | Yuge Atthavis Aarti

bhajan

युगे अठ्ठावीस | Yuge Atthavis Aarti :->भगवान विठ्ठल की स्तुति में गीत के साथ गाया युगे अथविस को सुनें, संजीवनी भेलांडे द्वारा सुरीली आवाज में गाया गया है।

युगे अठ्ठावीस | Yuge Atthavis Aarti

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा *
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा **
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा *
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा **

जय देव जय देव जय पांडुरंगा *
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा **

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी *
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी **
देव सुरवर नित्य येती भेटी *
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती **

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा *
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा **
राई-रखुमाबाई राणीया सकळा *
ओवाळीती राजा विठोबा सावळा **

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती *
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती **
दिंड्या पताका वैष्णव नाचती *
पंढरीचा महिमा वर्णाचा किती **

आषाढी कार्तिकी भक्तजन येती *
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती **
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती *
केशवासी नामदेव भावे ओवाळीती **

Read also

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!